Departures on 03 Nov 2025, 30 Dec 2025, 25 Jan 2026
51,575/-* Nashik to Nashik
What They Say About Us
Client Reviews
दुर्वोंकूर थ्री सिस्टर सहल यांनी नियोजना प्रमाणे योग्य वेळी, योग्य ठिकाण दाखवून ग्रुप मधील सर्वोंची विशेष लक्ष देऊन काळजी घेतली. विशेष बाब म्हणजे जेवणाच्या टेबलजवळ येऊन सर्वांची विचारपूस करून, दुसऱ्या दिवसाचे नियोजन सांगून मगच शेवटी जेवणे करणे.
त्यामुळे कुठलीही अडचण जाणवली नाही. गाडीतील ड्रायव्हर छान मनमिळाऊ होता. दोघांच्या सहवासत सहल सुखदायक वाटली. असे आयोजक सहलीला लाभल्यास सहलीचा आनंद छान घेतला आला सर्व ठिकाण अगदी व्यवस्थित दाखविले.
श्री व सौ. गजभिये नाशिक
सर्व दुर्वा कुर परिवाराचे आभार! ट्रिप मधील सर्व सदस्यांना खूप छान अनुभव आले. विशेष टूर गाईड माही यांचे नियोजन मस्त, मुलानं प्रमाणे आम्हा सर्वांची काळजी घेतली. कोणती अडचण जाणवली नाही. सर्व जण एकाच कुटुंबातील वाटत होते असं वाटतं होते. आम्ही दुपारी लग्ना आलो राहुरी कर अजून प्रवासात आहेत, एकंदर सहल छान आनंद मिळाला पुन्हा भेट अशी आशा करूया. धन्यवाद!
श्री व सौ वाघ
दुर्वांकुर हॉलिडेज मार्फत केलेली थ्री सिस्टर्स म्हणजे एक आठवण, आयुष्यभर म्हणण्याऐवजी आयुष्याच्या शेवटपर्यंत जपण्यासारखी. कधीही न विसरण्यासारखी. या बारा दिवसाच्या प्रवासातील आपला 16 जणांचा ग्रुप खूपच आदर्शवत वाटला. सर्वच जण एकमेकांना आधार देणारे व सहकार्य करणारे होते. त्यामुळे हे बारा दिवस कसे संपले हे कळलेच नाही. त्यामुळे आम्ही उभयता सर्वांचे मनापासून आभार मानतो. टीम मॅनेजर तर खरोखरच श्रावण बाळासारखंच प्रेम आम्हा सगळ्यांवर केले. त्याने प्रत्येकाची काळजी घेतली. त्यामुळे त्यालाही धन्यवाद. . दुर्वांकुर हॉलिडेज बद्दल जे ऐकले होते, जी माहिती मिळवली होती, त्याप्रमाणे खरोखरच चांगला अनुभव आला. भविष्यात जर टूरवर जायचे ठरवले तर निश्चितच दुर्वांकुर हॉलिडेज ला प्रथम प्राधान्य देईल.